एक आभाळ मोकळे

Started by शिवाजी सांगळे, October 05, 2018, 03:11:04 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

एक आभाळ मोकळे

आकांक्षा न्  इच्छांचे
मनास ओढ लावणारे,
आपल्या अस्तित्वाची
जाणीव करून देणारे..!

जमवून ते मेघ सावळे
अलगद बरसून देणारे,
सर्व हसऱ्या तारकांना
सुगंधी करून सोडणारे..!

तुझ्या माझ्या स्वप्नांचे
त्यांना पुर्ततेकडे नेणारे,
तारा झाल्यावर शेवटी
कवेत सामावून घेणारे..!

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९