अगतिकता

Started by C Ramarao, October 12, 2018, 03:20:15 PM

Previous topic - Next topic

C Ramarao

अगतिकता....

कोठुणी येते मज कळेना, अगतिकता ही या ह्रदयाला
व्दंदाची थबकुन पावले, नाचत जाते भयानमाला

शुभ्र धुके ही अबोल होवून, डोईवरती खुले चांदणे
भयान होवून संध्या सजते, अंधाराचे विणती जाळे

नक्षत्राच्या इवल्या दारी,होते झुलते पुन्हा अंबर
रात चकाकुन चमके चांदी, डोळे त्या गगनाला डोंगर

मिणमिणत्या वाऱ्या मधला स्वर,येतो छेडुन कानावरती
सप्त सुरांचे घेऊन वारे,कोण पुरवितो गगनावरती?

मला न कळले झुलते अंबर,हबकून गेले पुन्हा एकटे
वाऱ्यासंगे हिंडता हिंडता, क्षितीजासव पुन्हा मुकाटे

गर्द निळे आभाळ मोकळे, भयाण होते इथली संध्या
नक्षत्राचे देणे देवुन, मला न कळले निजली राधा

सि.रामाराव.  २१०९२०१८