जोखड

Started by C Ramarao, October 15, 2018, 10:08:48 PM

Previous topic - Next topic

C Ramarao

२९.  जोखड
बैल झुगारुन जोखड गेला, नाते माती मधले अपुरे
संभवतेच्या उंच नभावर, उकल नसे प्रश्नांची सारे

व्योम व्यापुनी नभास घेता, शिवार सारा हसतो आणि
बंधन सुटता घाव मुळावर, टपून सारे बसले सजनी

वादळ हलते घेऊन वारा, चार ही मुंड्या चित ढगाला
आडवा येतो चिरडत त्याला, उन्मळती झाडे रानाला

संपुन सरते अपुरी आशा, कुणास असते जाण तयाची
जगने ओझे अवजड होते, त्यातून सुटका असे कुणाची

सरते वादळ बैल ही थकते, वाहुन गेला झोपा आणि
झोपा गेला बैल ही गेला, सांग काय उरे ते सजनी

बिनकामाचा बैल रिकामा, अडचण होते गोठा आणि
टळुन जाते टळणाऱ्याचे, मरणे,खाटीक,रहाट गानी

बैल सोडुनी जोखड गेला, सोडून बंधन सारी नाती
माती मधल्या रान फुलांवर,मिसळून गेला हातो हाती

सि.रामाराव.१५१०२०१८