नसलेला तू

Started by दिक्षा गायकवाड, October 15, 2018, 10:48:42 PM

Previous topic - Next topic
तुला न बघणं म्हणजे सुर्याने प्रकाश न देणं ,
तुला न बघणं म्हणजे चंद्राच्या मंद प्रकाशाने प्रेम न देणं ।

तुझं न दिसणं म्हणजे मोरान पावसाची आतुरतेने वाट बघणं ,
तुझं न दिसणं म्हणजे तुझी ओढ लागणं ।

तुझी आठवण येणं म्हणजे डोळे ओले करून तुझ्यासाठी हसणं ,
तुझी आठवण येणं म्हणजे डोळे ओले करून तुझ्यासाठी रडणं ।

तू समोर येणं म्हणजे आभाळ भरून येणं ,
तू समोर येणं म्हणजे पावसाची सर येऊन जाणं ।

तुझा स्पर्श म्हणजे थंड वाऱ्याची झुळूक जशी ,
तुझा स्पर्श म्हणजे स्वतः पासून दूर मी अशी ।

तू जवळ असणं म्हणजे आरशात स्वतःच प्रतिबिंब पाहणं ,
तू जवळ असणं म्हणजे उन्हात एखाद्याला झाडाची थंड सावली मिळणं ।

तू सोबत असणं म्हणजे तुझ्यात मी अन माझ्यात तू असणं ,
तू सोबत असणं म्हणजे मी पूर्ण होणं ।

                                       - दिक्षा गायकवाड