घोडा

Started by C Ramarao, October 16, 2018, 09:21:37 AM

Previous topic - Next topic

C Ramarao

१४.  घोडा
संथ धावनारा  घोडा, एका लयीत धावतो
मज कळे नासे सूर्य, उलटा का डोकावतो

सात माळ्याची ही रांग, सांज सकाळी सजुन
धाप नसे त्याज लागे,  दम किती तो अजून

सुर्य माळातला जातो , कधि आडवा डोंगर
दऱ्याखोऱ्यातला असा,  रात दिनाचा संगर

भेटे राघु पाचू-मैना ,अमराईच्या बनात
चाले धांगडधिंगाना ,उड्या मारत मारत

घोडा धावे जेव्हा पुढे, मागे बघे नसे कधी
साधा डोंगर आंधळा ,असे उभा अपराधी

नदी खोऱ्यातुन आणि, फिरे वारा गात गाणी
पाला पाचोळा हसुन ,टाळी वाजवितो रानी

रान वाऱ्याचे हे गित ,ऐकू सावलीला येते
साद घालते झोपडी ,अंगाई ही खेडे गाते

रस्ता फाटुन हा पुढे , जातो दुरदुर देशा
झोपडीला पुसे कोण? तिच्या पदरी निराशा

मानवच यंत्र झाला ,जेव्हा घरी आला यंत्र
मन वाऱ्याचे तुटले , नसे त्याचे त्याला तंत्र

घोडा धावतो थांबतो ,तरी सुटे नसे लय
पदराच्या आड चाले ,तशी सारी हयगय

सुर्य अस्तागामी जातो ,जसा पल्याड डोंगर
गंगेतच न्हाला घोडा ,नदी ओलांडून पार

सि.रामाराव १८०९२०१८