आठवते ती पूर्वीची दिवाळी

Started by lanke.amol, November 06, 2018, 08:07:52 AM

Previous topic - Next topic

lanke.amol

आठवते ती पूर्वीची दिवाळी:

अँड्रॉईडच्या या कृत्रिम जगात येतात सणाच्या शुभेच्छा हजार,
आत्पेष्ट यांचा सहवास दुर्मिळ, माणूस मोबाईल मध्येच बेजार.

मन सहज भूतकाळात मारते रपेट, जुन्या आठवणींचा होतो एकच कल्ला,
आठवते मग ते फटाके उडवणे आणि मित्रांसोबत बांधलेला तो मातीचा किल्ला.

अनेक जिन्नस असायचे ताटात अगदी संजीव कपूर पेक्षा चविष्ट, मायेच्या साजूक तुपात तळलेले,
स्वयंपाकघरात काय बनत असेल हे फक्त एका दरवळात बाहेर मुलांना कळलेले.

टिकल्या, रोल, पाऊस, भुईचक्र, फुलबाज्या अगदी मनाच्या कोपऱ्यात आहेत करून वास,
दिवाळी पहाटच्या अभ्यंगस्नानाला समई, मोती साबण, तेल आणि उटणे असायचे हमखास.

नवीन कपडे घालून सर्व कुटुंब अगदी देवळात जाऊन भक्तिभावाने घ्यायचे देव दर्शन,
इतकी असायची खायची रेलचेल जणू घरात भरले आहे एक खाद्य प्रदर्शन.

पोहे संपवून मग प्रतीक्षा असायची शेजारून येणाऱ्या दिवाळी फराळाची, एक निराळीच गंमत,
अशी कुठे मिळेल हो प्रेमाची चव आता भलेही तुम्ही मोजाल कितीही किंमत.

परत एकदा जगून पाहू अगदी तशीच निरागस एक दिवाळी पुन्हा एकदा आज,
मन करू पवित्र, परिधान करू नवे वस्त्र, जमवू पुन्हा फराळ जत्रा, गिरवू तो जुना साज.

-अमोल लंके