स्पर्शवेडी थंडी

Started by ganesh pingale, November 16, 2018, 03:02:16 PM

Previous topic - Next topic

ganesh pingale

*"स्पर्शवेडी  थंडी "*

(ही  पोस्ट थंडीचा  मनोसोक्त  आंनद घ्यावा यासाठी  करून दिलेली आठवण  आहे.
मी लिहलेली ही  दुसरी पोस्ट.  )

थंडी  म्हंटले  की अंगाला  गार लागणारी वाऱ्याची एक हलकी  झळूक. थंडी चे  नाते  बहुतेक डायरेक्ट आपल्या  मनाशी तर  नसावे?
कारण  थंडीत येत  असणारा  शाहारा (काटा ) हा  त्यामुळेच  तर  येत असावा.
       थंडी म्हंटले  की  आठवते  ती  शाळेतील हिवाळी  स्पर्धा. तो निळा, लाल स्वेटर आणि  डोक्याची  कान पट्टी. खो -खो  कब्बडी  पाहण्यास खूप  मज्जा  यायची कारण  त्या  दिवशी अभ्यासला  सुट्टी असायची.
आपल्या वर्ग विरुद्ध खेळणाऱ्या  टीम ला  खिजवण्यात खूप  मज्जा  यायची.
"अरे  7 वी  अ  च  झाले  काय  खाली  मुंडी  वर पाय "ही आरोळी  क्षणात बालपणी  चा  प्रवास  घडून  आणायची . स्पर्धेत  मिळणाऱ्या  त्या लेमन  गोळ्या  ह्या  तर  खूप  मोठं  बक्षीस  वाटायच्या. हिवाळी सहल  ही  तर  जीवनात  एक नवीन  आनंद  घेऊन  जायची.
        थंडीत  स्वतःच्या  हात  चोळून ऊब घेण्याची मज्जा ही असतेच. आणि  स्वतःच्या  तोंडातून  धूर काढणे  ही  कला  सगळ्यांना  अवगत  असते. थंडीत  तुम्ही  शेकोटी  नाही शेकली  तर  तुम्ही  थंडी  नाही  अनुभवली .
         आज्या,संज्या, मन्या  सगळे मित्र आपापल्या  सासू (शेकोटी साठी लागणारे लाकडे, कपडा, टायर ) घेऊन  या  आणि  ज्याची  सासू  जास्त  वेळ जळली त्याचीच सासू  चांगली. शेकोटी  करताना कागदाची विडी करून  तोंडातून  धूर नाही  काढला  तर  मग तुम्ही  कसली  थंडी  अनुभवली.
सकाळी  मात्र  नाक  काळे  पडल्यावर कोळश्याच्या खाणीत काम केल्या सारख वाटायचे आणि मग  आरशात बघून स्वतःच  स्वतःला  हसायचे.
   सर्वांत महत्वाचे म्हणजे  फक्त  थंडीत  जीम ला  जाऊन  शरीर  सुधरवणाऱ्या प्राण्यांची संख्या  वाढते  आणि  थंडीत  संपताच  ती  प्रजाती  लोप  पावते.
मात्र  आता थंडी फक्त  येते  आणि  निघून  जाते.
आता  का  आपण  अनुभवत नसेल ही  "स्पर्श वेडी " थंडी????
🤔🤔🤔

                     स्वतः  गणेश पिंगळे