पांघरून

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:40:50 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

जाब विचारला जात नाही
तिथे,
चिरडलेल्या त्या हातांना
झाकुन टाकतात,
अनं ते वावरतात सभ्य पणाची
झालर लावुन,
आ ही निघत नाही कुणाकडून
लाचार होतात,
मग सवाल उठतो
अंधार सरायला अजुन प्रकाश पोहचेल का.
का फक्त मस्तकात ठस ठसत राहील
तुझ्या माझ्या सारख्याचं प्रामाणिक पणाच
दुखणं
खुरट होऊन.