आयुष्य

Started by mswalimbe, December 28, 2018, 08:14:26 AM

Previous topic - Next topic

mswalimbe

आयुष्य म्हणजे नियतीचा खेळं
त्यानं नाचवावं त्याच्या तालावरं
अन् आपणं असावं मात्र अनभिज्ञं
आयुष्य म्हणजे विधात्याचा रंगमंच
वेगवेगळ्या मुखवट्यांनी वावरावं
अन् आपणं व्हावं मात्र प्रेक्षकं
आयुष्य म्हणजे सारीपाटाचा डावं
कधी चित कधी पट
कधी सरशी कधी हारं
कधी सुखं कधी दुःखं
आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव
उन्हाच्या आतपाने व्हावे मन रुष्टं
पावसाच्या शिडकाव्याने व्हावे मन प्रफुल्लितं
आयुष्य म्हणजे साधं सरळं जगणं
आलेला दिवसं आनंदात कंठणं
मिळालेल्या क्षणांना जमलचं
तर ओंजळीत समावणं
आयुष्य म्हणजे जुन्याची आठवणं
नव्याची जपणूकं
माणसांची साठवणं
नात्यांची उजवणं
आयुष्य असचं जगावं
कुणाही डोळा न  पाणी आणावं
स्वार्थापेक्षा परमार्थ ला स्थान द्यावं
मैत्री करावी निर्भेळ अशी
अन् निरोप घेताना या जगताचा
निघून जावे गुपचूप आपणं
इतरांना ही वाटवी हळहळं

मृणाल वाळिंबे