तुझा हक्क

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 16, 2019, 11:13:22 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझा हक्क*

बदलले जरी रोज शोपीस घरात माझ्या
तुझा हक्क आज ही आहे उरात माझ्या

कुंपणावर सजलेली
रंगलेली फुले असतात
नकळत तुला पाहून
ती जराशी हसतात

भ्रमरे ही जरा वेडी झाली सुरात माझ्या
तुझा हक्क आज ही आहे उरात माझ्या

एकटं पण आजही
घाव हृदयाला देतं
जखम खुणावते
अन हृदयाचं पाणी होतं

असलो जरी एकटा असतो भरात माझ्या
तुझा हक्क आज ही आहे उरात माझ्या

गोडी गुलाबी तुझी
खरंच भावली मनाला
वेड पाहून माझं इथे
नाही कळलो कोणाला

नजर चुकली तरी असतो भासात माझ्या
तुझा हक्क आज ही आहे उरात माझ्या

नाही जमलं कधी
मला तुला विसरणं
सात फेरे नाही झाले
तरी तुझं हृदयात विरणं

विसरणं सोड तू आहेस श्वासात माझ्या
तुझा हक्क आज ही आहे उरात माझ्या

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर