झरा नयनांचा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 30, 2019, 12:41:24 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.झरा नयनांचा*

चांदण्याच्या झुल्याव झुला मी घेतला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

तुझे नाजूक गाल
जणू हिरवळीची शाल
मिठीत ये ना जराशी
माझे खूप होतेया हाल

रूप साजिर गोजिर चुडा हाती नेसला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

अप्सरा दिसावीस तू
खाणी मध्ये हिऱ्याच्या
जीव कासावीस झाला
अवतीभवती नखऱ्याच्या

नखरा पाहून जरासा हृदयी ठोका चुकला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

सावली अंधुक पाहून
जशी समोर तू आली
गोंधळ पालविचा झाला
अन पानगळ सुरू झाली

रेशमी केसांचा गजरा आकाशी उडला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

शब्द फुटले ओठांवर
तरी बोलणे नाही झाले
साखर झोपेत पहाटेच्या
पुन्हा शब्द बहरून आले

स्वप्नी येता तू घडा आठवणींचा फुटला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

सरण सजले होते
नदीच्या किनारी
प्रेमात वेडा झालो
शेवटी ठरलो जुवारी

प्रेमाचा डाव तू खेळून घाव हा घातला
तुला पाहून सखे झरा नयनांचा आटला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर