वेळ नव्हता पुरेसा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 21, 2019, 10:15:06 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.वेळ नव्हता पुरेसा*

वेगळीच दुनिया होतीस तू
अन वेगळा मी ही जरासा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

अगं हसर पण तुझं
अन मधाळ मी ही जरासा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

जिव्हाळ्याची खाणं सखे तू
तुला पाहून मनी भेटायचा दिलासा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

तुझं लाजून लपंडाव खेळणं
प्रेमाचा व्हायचा तेव्हा खुलासा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

कधी अश्रू वेचतांना दिसलो सांग
इथेही काधी ना धरलास भरवसा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

लाल बुंद गाल तुझे हृदय जाळणारे
ते पाहून ही जरा मी झालो धुसरसा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

एक जीव झालो खरे आपण
कधी मिळाला नाही बघ आडवसा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

सखे खरं सांग ना तू मला
तुझ्या हृदयातून का होतं गेलो अंधुकसा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

नयन ओले चिंब झाले हात सोडतांना
दुःखात जवळ केला ना मी तो आरसा
तू होतीस अशी की पाहतांना
अन सावरतांना वेळ नव्हता पुरेसा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर