मराठी राजभाषा दिन

Started by Minakshi Pawar, February 28, 2019, 06:12:42 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

२७ फेब्रुवारी मराठी राज भाषा दिवस. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिध्द कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म दिन हा ' मराठी भाषा गौरव दिन ' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची महती काय आणि कशी सांगावी. खुप गोड प्रेमळ अशी आपली भाषा आणि ह्याचा भाषेतून किती भाषांनी जन्म घेतला कोकणी, खानदेशी, वाह्राडी इ. आपल्या मराठी ची माय माऊली म्हणजे संस्कृत.
     खूप संपन्न अशी हि मराठी भाषा ह्यात खूप साहित्य आहेत. खूप मोठे लेखक कवि होऊन गेलेत मंगेश पाडगावकर, राम गणेश गडकरी , इंदोरा संत, बहिणाबाई इ. आणि आणखी आगणित लोकांनी साहित्य संपन्न करून ठेवले आहेत.
     इतके असून सुद्धा आज आपल्यालाच आपल्या  भाषेची लाज वाटते. ते कसं? तर बघा आॕटो वाले, टॕक्सी वाले ह्यांच्याशी नकळतच आपण हिंदी बोलतो. अरे जर आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण हिंदी बोलून काय सिद्ध करतो कि मी खूप सुशिक्षित आहे. का मराठीला काही किंमत नाही , की देत नाही . कि आपण हिंदीला प्रथम स्थान देत आहोत. का आपण आपल्या मुलांना सांगतो  सोड ते मराठीच पुस्तक इंग्रजी वाच? का? असे खूप मनाला भेडसावनारे प्रश्न उपस्थित झाले आहे .
         आज प्रत्येक खाजगी शाळेत हिंदी आणि इंग्रजी बोलल्या जाते पण आपल्या भाषेतला गोडवा सांगितल्याच जात नाही. मराठी भाषा अशी आहे कि ज्याला ती कळली तो लगेच तिच्या प्रेमात पडतो. इंग्रजी काळाची गरज आहे पण मराठी आपली जबाबदारी आहे. आपण कितीही शहरात गेलो तरी आपले खेड्यातले घर कधीच नाही विसरू शकत तसंच आपल्या भाषेचे आहे .
         मी मराठी आहे हे सांगायची लाज नका वाटू देऊ. मी मराठी आहे आणि मराठीतूनच बोलनार. मला मराठी  भाषेचे खूप आकर्षक आहे अस पण ऐकलं आहे . माझ अस म्हणण नाही की तुम्ही दुसरी भाषा बोलू नका पण  आपल्या भाषेची लाज नका वाटू देऊ आणि काम मिळत नाही म्हणून आपण नाव बदलून घेऊ नका. मुलांमध्ये भाषेच प्रेम जागवा. आपल्या भाषेच आयुष्य आपल्या हातात आहे. आपण ते जपायला हवं म्हणून आज पासून ठरवून टाकूया मी मराठी बोलतो त्याचा मला अभिमान आहे आणि मी मराठीतच बोलणार !!!!!
          मराठी भाषा आमुची
           आहे खूप लाडाची,
           जपतो आम्ही तीला
   कुसुमेग्रजांनी वसा आहे दिला ,
अभिमान आहे मराठी असल्याचा
     त्यातील साहित्य जपल्याचा,
    लाज नका हो बाळगू मराठीची
   तीच माऊली आहे सगळ्यांची..

माफ करा पोस्ट करायला थोडा उशीर झाला 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
मराठी राज भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा🚩🚩🚩

कु. अंजली मोहनराव पवार
pawaranjali416@gmail.com