तू नसण्याचं स्वप्नं पडायचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 07, 2019, 12:42:25 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तू नसण्याचं स्वप्नं पडायचं*

भर पावसात चिंब भिजून
डोळ्यांच्या कडा जेव्हा
तुडुंब भरायच्या ना
तेव्हाच कळून चुकायचं
स्पर्श होणार तुझ्या मोहक अदाकारीचा
मग कुठं तरी चुकल्यागत व्हायचं
अश्रूंचा थेंब ओघळून यायचा
तू नसण्याचा पुन्हा भास व्हायचा

हे पाहून आकाश ही ठिंम होऊन रडायचं
मग नकळत तू नसण्याचं स्वप्नं पडायचं

तुझ्या माझ्या मिलनाची
रात कधी आलीच नाही
दिवस दिवस मोजून ठेवायचो
तू आलीस कुठून गेलीस कुठून
कधी दिवसाची रात्र झाली
कधी रात्रीचा दिवस कळलाच नाही
कधी सुखाचा माझा बंध जुळलाच नाही

हे पाहून आकाश ही ठिंम होऊन रडायचं
मग नकळत तू नसण्याचं स्वप्नं पडायचं

जीवनाची कधी वाट चुकली
मनाला कधी कळलंच नाही
कधी कधी काटेरी वाटा तुडवत
तू येण्याच्या प्रत्येक वळणावर
जिथं एकटा निपचित उभा रहायचो
ते झाड ही निपचित
पानगळीनं एकटं पडलं
जसं ते ही माझं दुःख पाहून कोसळलं

हे पाहून आकाश ही ठिंम होऊन रडायचं
मग नकळत तू नसण्याचं स्वप्नं पडायचं

तू असल्याची आशा
तू नसल्याची नशा
माझ्या दशक्रियेला
माझ्या पिंडा भोवती ठेवली जाते
त्या काक स्पर्शा साठी
पण तिथंही घोड माती खात
मनी एक खंत असते ती अपुरी
अन शेवटी प्रेम कहाणी राहते अधुरी

हे पाहून आकाश ही ठिंम होऊन रडायचं
मग नकळत तू नसण्याचं स्वप्नं पडायचं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर