Pulwama #अभिनंदन चे वंदन

Started by shivamnikhade12@gmail.com, March 07, 2019, 07:58:54 PM

Previous topic - Next topic

shivamnikhade12@gmail.com

#अभिनंदन चे वंदन

पुलवामा चा आतंकी हमला
जाब विचारे देश सारा
करुनी उध्वस्त जैश चा ठिकाणा
बदला घेतला बलिदानाचा |

दिली खूली मुबा लष्कराला
सलाम ठोकीत देश सारा
राजकीय इच्छाशक्ति चा बाणा
पराक्रम असा हा वायुसेनेचा ||

येई दुश्मन सीमारेषा ओलांडून
तावडीत स्वतः शत्रूच्या जाऊन
शौर्याने लावीत प्राण पणाला
देई जवाब अभिनंदन |

आला वाघा सारखा दहाडून
शत्रूच्या मातीवर जाऊन
भारत मातेच्या या वीराला
करी देश सारा वंदन ||