तुझ्या तिरस्कारांन

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 15, 2019, 11:47:47 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझ्या तिरस्कारांन*

प्रेमात असाही कुठे वाटतो सलग मी
तुझ्या तिरस्कारांन सोडावं वाटतं जग मी

तुझं नाकारणं
तुझं गोंजारण
सहजच कसं
तुझं सोडून जाणं

हृदयातुन तुझ्या होतो आता विलग मी
तुझ्या तिरस्कारांन सोडावं वाटतं जग मी

किती कविता लिहल्या
किती दुःख सोसले
उगाच नाही कसे
अजून प्रेम पोहचले

पोहचले जरी प्रेम जपून ठेवली धग मी
तुझ्या तिरस्कारांन सोडावं वाटतं जग मी

ओढणीचा सुगंध
झालो होतो बेधुंद
कधी झाली जवळीक
कधी टोचला बाजूबंद

विरहाच्या बाजूबंदात अडकलेला ढग मी
तुझ्या तिरस्कारांन सोडावं वाटतं जग मी

कधी आलो समोर
कधी रडतांना दिसलो
अश्रूंची किंमत केलीस
का इथेच सारा फसलो

नजरचुकीने हृदयात दिसतो का बघ मी
तुझ्या तिरस्कारांन सोडावं वाटतं जग मी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर