जरासे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 15, 2019, 11:51:21 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जरासे*

त्या वेदनेला वेदनेने विचारले जरासे
तू नसता जवळी कवितेने तारले जरासे

असे किती मुखवटे बदलायचे रोज मी
मुखवट्यांनी जीवन नाही उभारले जरासे

जखम रोज भलभळणारी असते उरी
अंतरातल्या मनाला ही मी मारले जरासे

तूच एक वेडी मज धुडकारून गेली
त्या दुःखाच्या पसऱ्याला आवरले जरासे

प्रेमाची अन माझी अशीही दोस्ती झाली
सुख गेले बाजूला अन दुःख उरले जरासे

गळा भेट झाली माझी शेवटच्या श्वासाशी
श्वास अडकला तेव्हा अंग शहारले जरासे

मृत्यूची बाजू धरावी म्हणालो जरी आधी
मागे पाहता घराचे वासे ही फिरले जरासे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर