तुझा विसर होतांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 19, 2019, 06:58:10 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझा विसर होतांना*

तुझ्या मिठीतुन तिच्या मिठीत जातांना
अधुरा वाटतो मी तुझा विसर होतांना

लाख गेले स्वप्नं
लाख आले स्वप्नं
तुझ्या आठवणींच
मनात रोज खुपन

भ्रमर आठवणींचा भोवताली गुंगूनताना
अधुरा वाटतो मी तुझा विसर होतांना

तू येतेस तू जातेस
आडोसा धरून पाहतेस
सावली होऊन अंधुकशी
माझ्या सावलीशी भांडतेस

भास झाला तुझ्या सावलीचा कळतांना
अधुरा वाटतो मी तुझा विसर होतांना

कवितेत असतेस
हृदयात नसतेस
एकांतातल्या झोपेत
येऊन गाली हसतेस

एकांतातल्या झोपेत नकळत तू येतांना
अधुरा वाटतो मी तुझा विसर होतांना

वहीतलं गुलाब कधी
वारा होऊन जवळ येतेस
फसगत करून मग तू
हृदयाची धडधड होतेस

वाऱ्यासवे गीत तुझे कानी गुंज करतांना
अधुरा वाटतो मी तुझा विसर होतांना

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर