माय

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 19, 2019, 06:59:42 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.माय*

माय लेकरांसाठी
अश्रू रानात पेरती
धनी नावाचा वसा
काळजात कोरती

माय हमसून रडतांना
फुटतो आभाळाला पान्हा
फांदी लटकत्या झोळीत
रडतांना तिचा तान्हा

माय रघात सांडते
भेगाळलेल्या भुईवर
उगवेल माणिक मोती
ती घेता नांगर डोईवर

माय अश्रूंचा करी काला
पोट लेकरांचे भराया
लोकं जमा होती सारे
तिचे दुःख पाहाया

माय वेचून आली
सुख दुःख ते रानात
नाही केला कधी तिने
दुजाभाव हा कोनात

माय विसरून गेली
कुंकू गेलेलं फासावर
कुरवाळून ठेवल्या तिने
आठवणी चार कोसावर

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर