प्रेमरंग

Started by Mahesh Thite, March 25, 2019, 09:36:23 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

*प्रेमरंग*

होळीच्या या सणाला, तुला रंग लावण्या आलो,
तुझ्यासोबत रंग खेळताना, तुझ्यातच रंगुनी गेलो।।

इंद्रधनुचे सप्तरंग उमटले होते तुझ्या अंगी,
ते रंग न्याहाळताना लवते ना माझी नयन पाती।
नजरेत साठवताना तुला,मी तुझ्यात हरवलो,
तुझ्यासोबत रंग खेळताना, तुझ्यातच रंगुनी गेलो।।

लाल रंग खुलवित होता तुझ्या गालाची लाली,
पिवळा रंग सजवित होता तुझ्या तनूची कांती।
तुझ्या जवळ येऊनी मी जागीच थिजलो,
तुझ्यासोबत रंग खेळताना, तुझ्यातच रंगुनी गेलो।।

हातात रंग घेऊनी तू जवळ आली,
नटखट तुझ्या अदांनी माझी काया भिजवली।
रंगाने भिजण्यापेक्षा तुझ्या प्रेमानेच भिजलो,
तुझ्यासोबत रंग खेळताना, तुझ्यातच रंगुनी गेलो।।

रंग उतरेल पाण्याने तुझ्या-माझ्या कायेचा,
मात्र, उतरणार नाही रंग तुझ्या-माझ्या प्रेमाचा।
आज सायंकाळी या होळीला जरी संपायचंय,
तरीही प्रत्येक दिवशी मला तुझ्या प्रेमात रंगायचंय।।
       
                          -- महेश थिटे,
                                अहमदनगर