निरोप....

Started by svarpe93@gmail.com, April 29, 2019, 05:41:02 PM

Previous topic - Next topic

svarpe93@gmail.com

मातृभूमीच्या लज्जारक्षणासाठी स्वतः पदर होऊ घातलेल्या त्या शूरवीरांच्या पावन स्मृतीस सादर अर्पण....
निरोप....
पप्पा आज जाणार आहेत हे बहुतेक छकुलीला माहित झालं असावं म्हणून सकाळीच उठून रुसून बसली होती . तोही काय करणार ,सुट्टी रद्द करून अचानक सीमेवरून बोलावन आलं होतं.बॅग भरून झाली ,कदाचित बॅग सोबत ऊर पण भरून आला होता पण दाखवला नाही तरीही तीने मात्र अचूक ओळखलं असावं ,आणि का नाही ओळखावं ? गेली पाच वर्षे संसार केलाय .त्याच मन कसं नाही ओळखणार ?प्रेमाचं रोपटं कसं नाजूक पणे तीनं आजही तेवढ्याच जिव्हाळ्यानं जपलं होतं.
जरा मुद्दामच मोठ्या आवाजात त्याने हाक दिली "अंग ए ऐकलंस का ? मला ना काही कळत नाहीये बघ,या आपल्या छकुलीला परत येताना काय आणावं काय समजत नाहीये"इतका वेळ गप्प बसलेल्या छकुलीच आता जणू फुलपाखरूच झालं.उमळणाऱ्या नाजूक कळीकडे एखाद्या भोवाऱ्याने एकटक पाहत राहावं असाच त्या फुलपाखरला तो कित्येक वेळ पाहत बसला,आणि स्वतः शीच हसला.बहुतेक पापणीतून येणारं पाणी लपवत होता.
तीन दिवसांनंतर आज तो त्याच्या आर्मी च्या कॅम्प मध्ये रिपोर्ट करत होता जरा घाईतच होता.पण चेहऱ्यावर तेज आणि छातीवर अभिमान दिसत होता.
खांद्यावरची बंदूक सावरत तो आणि त्याचे आणखी काही जवान जोडीदार सीमे च्या दुशेने चालत होते .बहुतेक शत्रूकडून गोळीबार झाला असावा. अधून मधून कानावर "आगे बढो, छोडना नही"असं काही तरी कानावर पडत होत.पण मातृभूमीच्या रक्षणासाठी घेतलेली शपथ सोडून आज त्याला दुसरं काहीच आठवत नव्हतं.खरंच काय होता तो गर्व !! स्वतःवर नव्हे तर मी या मातीचा, या आईचा मुलगा आहे या जाणिवेवर.काय होता तो अभिमान !!याच आपल्या आईसाठी लढण्याचा. आणि काय होती ती डोळ्यातली आग!! शत्रूची दिसताच राख करणारी.
अंदाधुंद गोळीबाराने वातावरण भयावह झालं होतं.हातातली बंदूक पुन्हा लोड करून तो सज्ज झाला.दबक्या पावलांनी एखाद्या वाघाने शत्रूवर तुटून पडावं अशीच ती चाल होती. या आईचा वाघ तिच्या सर्वस्वासाठी उभा ठाकला होता.केवळ तिच्यावरील प्रेमापोटी!
कधी माणसांचा तर कधी नुसताच हवेचा वेध घेऊन बंदुकीतून गोळ्या सु सु करत होत्या. आणि अखेर त्या युद्धभूमीत विजयी ध्वज ध्वज रोवण्यात तो आणि त्याची तुकडी यशस्वी झाली होती. पण.....
मातृभूमीच्या रक्षणासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या त्या मुलाला कवेत घेण्याच्या या आईलाही मोह आवरला नसावा.तिनेही त्याला जवळ घेतलं होतं पण कायमचचं.शत्रूच्या एका गोळीने त्याचं देशासाठी आणि नंतर परिवारासाठी धक-धक करणारं हृदय अचूक टिपलं होत.तोच गर्व तोच अभिमान आणि तीच आग घेऊन हा वीर आता शांतपणे आईच्या कुशीत विसावला होता.....
तिच्या थकलेल्या डोळ्यांची अश्रूंनी सुद्धा आता साथ सोडली होती.पापन्यांनी पण उघड झाक करनं बंद केलं होतं.पुसलेल्या कुंकवामुळं लालबुंद झालेलं कपाळ तिच्या निस्तेज चेहऱ्यावर आणखीच भर घालत होतं.
छकुलीला दिलेला शब्द त्याने राखला होता.खरंच तो लवकर परत आला होता.पण परिवारासाठी आठवणी ठेऊन पुन्हा जाणार होता....... कायमचाच
समोर ठेवलेल्या त्याचा सतेज चेहरा सोडून तिला काहीच दिसत नव्हतं.बोबड्या आवाजात पप्पा-पप्पा म्हणणारी छकुली, आता बोलणंच विसरून गेली होती."पप्पा उठा ना हो.मी ना कुठंच फिरायला जायचं म्हणनार नाही ,काहीच मागणार नाही पण तुम्ही उठा ना हो"एवढंच कसं बसं बोलू शकत होती.
गावात प्रत्येक घरापुढे आज रांगोळी काढली होती पण आज दिवाळी नव्हती.तो वीर आज कायमचा चालला होता.फुला माळांनी रथ सुंदर सजवला होता पण लग्नासाठी नव्हे तर त्या शुराच्या शेवटच्या यात्रेसाठी.एखाद्या नवख्या माणसाला प्रश्न पडावा कि हि शोक सभा आहे कि सण असाच तो दिवस होता.
भारतीय ध्वजात लपेटलेल्या त्याच्या चेहऱ्यावरील भाव तुसभरही कमी झालेले नव्हते.तीच शान अगदी तशीच.त्याच अभिमानात आणि तोऱ्यात सैन्यदलातील त्याच्या मित्रांनी भावपूर्ण मनाने त्याला अलगद खांद्यावर घेतलं होतं.अश्रुंचं येनं आणि त्याचं जाणं कशालाही ते थांबऊ शकत नव्हते.गर्दी मधून प्रत्येक जण वाट काढत त्या आईच्या लाडक्या मुलाला शेवटचं डोळ्यात साठवून घेत होता.
बंदुकीतून निघणाऱ्या आवाजाबरोबर
पाहता पाहता उंचच उंच आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपाऊ लागल्या.आणि बराच वेळ राखून ठेवलेले अश्रुंचे बांध आता फुटू लागले.इतिहासाच्या पानांत आणि जनमाणसांच्या मनात सोनेरी अक्षरांनी नाव कोरून तो आता निघाला होता.
मातृभूमीरूपी मोत्याचा नाजूकपना जपण्यासाठी आज या शिंपल्याने त्याच उभं आयुष्य वेचलं होतं.
उठणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळा ती आणि छकुली लांबूनच पाहत होत्या.कदाचित त्याच्या जुन्या आठवणीत गुंतल्या होत्या.आणि वाहणाऱ्या डोळ्यांना पुन्हा एकदा वाट मोकळी करून देत होत्या.
लेखक- सागर बाबासाहेब वर्पे
(BE Mechanical)
रा-कनोली,ता-संगमनेर
जि-अहमदनगर.
9975994915
svarpe93@gmail.com
Sagar varpe
(7020845767)