"काही मागे राहिलाय का??"

Started by svarpe93@gmail.com, April 29, 2019, 05:54:52 PM

Previous topic - Next topic

svarpe93@gmail.com

काही तरी अस की ज्यामुळे स्वतःशी बोलायला भाग पडलं...
जीवन नौकेला आयुष्य सागरात घेऊन अडचणीच्या वादळशी दोन हात करताना सारखा पडणारा प्रश्न...

"काही मागे राहिलाय का??"
************
सकाळी सकाळी आपल्या तानुल्याला पाळणा घरात ठेऊन ऑफिस ला जाणाऱ्या तरुण आईला त्या छोट्या जीवाला दिवसभर सांभाळणाऱ्या म्हाताऱ्या आईने विचारलं "मुली......काही राहील तर नाही ना ??" आता तिनेही काय आणि कसं सांगावं सगळं काही मिळवण्यासाठी पैश्या मागे जाता जाता ज्याच्यासाठी सगळं करतेय तोच मागे राहिलाय.....😢😢😢😢
***********
थाटामाटात लग्न लावून स्वतःच्या मुलीला सासरी वाट लावून देणाऱ्या बापाला कार्यलयाच्या मालकाने विचारलं "साहेब हॉल मध्ये काही राहील तर नाही ना??"
मंडपभर पडलेल्या सुकलेल्या फुलांवर एकवार नजर फिरवून त्यानं पाहिलं काय राहिलाय.खरं तर २५ वर्ष जिच्या नावामागे अभिमानाने स्वतःच नाव लावलं होत ते नाव आता एकटच होत.
जरा वेळ गप्प राहून डोळ्यातलं पाणी पुसत पूसत मनातच म्हणाला असावा."सगळंच तर राहून गेलय आता"........
***************
अंत्यविधी संपवून परत फिरणाऱ्या त्या तरुणाला कुणी तरी गर्दीत म्हणालं "बाळ अरे काही राहीलं तर नाही ना??"
धावत पुन्हा एकदा तो चितेजवळ गेला आणि शेवटचं एकदा स्वतःच्या वडिलांच्या चेहऱ्याला त्या धग्धगणाऱ्या आगीत जरा वेळ शोधत बसला.आणि पराजित होऊन परत आला.काय राहील होत म्हणून विचारलं तर म्हणाला "आता कसलं काय राहील जे होत ते सगळं डोळ्यासमोर जळतय आता दुसर काय राहणार".....

खरंच काही मागे राहिलाय का????
***********
जुन्या आठवणीत खरंच एकदा तरी फिरून यावं ...काय सांगावं जगायला काही तरी आणखी नवीन कारण मिळून जाईल......
नाहीतर काय विसरलोय हेच शोधता शोधता
आयुष्य संपून जाईल....

लेखक- सागर बाबासाहेब वर्पे
(BE Mechanical)
रा-कनोली,ता-संगमनेर
जि-अहमदनगर.
9975994915
svarpe93@gmail.com
Sagar varpe
(7020845767)

Rajiv p

 
         *** राजेश ***
  कळलच नाही काळिज माझं
  तुला केव्हा दिलं ।
  काय सांगु प्रिये मी
  तुझ्यावर किती प्रेम केलं ।।
          # पायल #