कळी

Started by Sagar salvi, May 19, 2019, 04:43:10 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

झाकले दरवाजे असता
आत कोण घेतं,

कोण जाणे त्या कळ्यांना
रंग कोण देतं.

काय रंग असेल कळीचा
रोपट्याला नाही ठाव,

रोप उगाच बहरून येते
आणते माहिती असल्याचा आव.

एक खंत आहे कळीला
स्वतःला पाहता येतं नाही,

जन्म देणार झाड स्वतः
कळीला जवळ घेतं नाही.