चपला

Started by Sagar salvi, May 20, 2019, 12:37:11 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

चपलांचा प्रवास !
मी काल दुपारी गावात गेलो होतो, येताना म्हटलं सावलीत बसाव थोडा वेळ म्हणून चपला बाजूला काढून झाडा खाली बसलो. आणि पुढे लांब दुसऱ्या झाडाखाली काही तरी असल्याच जाणवलं म्हणून तसाच बघायला गेलो.

आणि परत येऊन बघतोय तर चपला जागेवर न्हवत्या. ऊन इतकं जास्त होतं की बिना चप्पल जायचं हा विचारच चटके देतं होता. थांबणार किती वेळ मग निघालो. म्हटलं जाऊ चल.

चटके खूप लागतं होते, मधे मधे मी आणि माझे डोळे सावली शोधू लागलो. घरी जायला एक तास जातो आणि आज अर्धा रस्ता पण न्हवता ओलांडला आणि पायाला त्रास होऊ लागला होता.

मधे दोन भिंतीच्या मधे जागा होती आणि त्यात सावली होती. मी तिथे गेलो. आणि मला तिथे बुट सापडले, कोणाचे होते माहिती नाही. पण माझ्या पायाला बसतील अशे होते.

मी ते घालून निघालो. दुसरं पर्याय न्हवता. मला असं वाटत होतं की हा पर्याय मला चपलेने चं दिलाय. नाही तर माझी चप्पल हरवली असताना दुसरी चप्पल कधी मिळते.

मी ते बुट घालून निघालो. आणि घराच्या इथे पोचलो. त्या चप्पला माझ्या न्हवत्या म्हणून त्या घरी घेऊन जाऊ शकत न्हवतो. त्या खाली ठेऊन मी घरी निघून गेलो.

संध्याकाळी परत कामावर जायला निघालो आणि पाहिलं तर सकाळचे बुट एका बिल्डिंग मधे काम करणाऱ्याच्या पायात होते. आणि माझ्या पायात माझ्या कामाचे बुट होते.

यातून एक गोष्ट लक्ष्यात आली की आपण नाही निवडत चप्पलेला, चप्पल आपल्याला निवडते.