हिशोब

Started by Sagar salvi, May 20, 2019, 12:41:04 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

आयुष्याचा हिशोब !
मी स्वतःला तेंव्हापासून ओळखतो जेंव्हा मी लाकूड तोडायचं काम करत होतो. नंतर मला एका लाकडाच्या कारखान्यात काम मिळालं. दिवसभर काम करून मला 400 रुपये मिळायचे. जाताना भाजी आणि घरात लागेल ते सामान घेऊन बाकी प्रवासाला लागतील ते पैसे खिश्यात ठेऊन, राहिलेले सगळे पेटीत जमा करायचो.

खूप वर्ष असच काम केलं, स्वतःच्या डब्यापासून ते कपडे धुण्यापरेंत घरगडी मीच होतो. कुठून तरी एक विचार आला आणि लांबच्या नातेवाईकांनी लग्न करून द्यायचं ठरवलं. त्यांनी ठरवलं होत त्यामुळे मला विचारण्याचा काही प्रश्नच न्हवता.

आयुष्यात नलिनी नावाची स्त्री आली. जिने घराचा ताबा घेतला. तिला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या. पैसे, कपडे, काम आणि जेवण या सगळ्यांची जबाबदारी तिला देऊन टाकली.

मी सकाळी पाच वाजता उठायचो आणि नलिनी चार वाजता उठून कामाला सुरवात करायची. माझा जेवणाचा डब्बा आणि माझे कपडे काढून ठेवलेले असायचे. प्रत्येक दिवसाचा पैसा तिच्या हातात द्यायचो आणि एक वही बनवली होती त्यात खर्चाची नोंद करायला सांगायचो. ती आल्यापासून मी वहीकडे लक्षच दिल न्हवतं.

भाजी, घरं खर्च, माझा प्रवास खर्च, पेटीत जमा करायचा पैसा आणि तिला खर्चाला अशी पैश्याची विभागणी होऊ लागली.

दोन वर्ष छान गेली होती. मी सकाळी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. एक दिवशी अचानक कामावरून काढून टाकलं याची बातमी आली. कारखान्यात जाऊन बघितलं तर टाळ होत. नलिनीला कस सांगायचं हाच प्रश्न होता. मी काही सांगितलंचं नाही. दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे तयारी करून बाहेर पडलो. दिवसभर इकडे तिकडे फिरून परत संध्याकाळी घरी आलो.

आजचा दिवस तर गेला पण उद्याच काय असं फिरत राहून नाही चालणार. दुसऱ्या दिवशी कारखान्यातल्या मित्रांना भेटलो आणि काम आहे का विचारलं. येत येत एका लाकडाच्या दुकानात सुद्धा गेलो आणि काम मागितलं तर उद्या पासून ये म्हणाले आणि दिवसाचे दोनशे रुपये मिळतील असं ठरलं.

वेळ सारखीच होती त्या मुळे समस्या सुटली पण पैश्यात फरक पडणार होता. चार दिवस झाले कामाला जाऊन आणि पाचव्या दिवशी गेलो तर दुकान बंद गुरुवार होता. मला माहिती न्हवतं त्या दिवशी लवकर घरी जाण्याचा योग आला. घरी गेलो तर घरात खूप सामान पडलं होत.

त्यात नलिनी कुठे दिसत न्हवती. आणि खूप बायका पण होत्या घरात. मला लवकर आलेलं बघून तिला आश्चर्य नाही झालं. मी म्हटलं हे काय आहे सगळं. ती म्हणाली जेऊन घ्या आणि मला फक्त चार वाजेपरेंत वेळ दया सगळं सांगते.

मी मुलाखतीची वेळ घेतल्या प्रमाणे चार वाजायची वाट बघत होतो. चार वाजता मैदान रिकामं झालं. मग तीने चहा केला आणि मला समोर बसवलं आणि सांगायला सुरवात केली.

तुमची नोकरीं गेली हे मला माहिती होत. दिवसभर घरात बसून मी काय करणार म्हणून मी हे काम चालू केलं. यात मला किती पैसे मिळतात ते आपल्या हिशोबाच्या वहीत लिहून ठेवलय. हिशेबाची वही बघितली तर तस काही लिहिलं न्हवतं. मग तिने वही मागून चाळायला सांगितली. तिचा हिशोब सगळा मागे लिहिला होता.

तिला एका स्वेटरचे चारशे रुपये मिळायचे. आणि ती सगळे पैसे जमा करत होती पेटीत. मला मिळत असलेल्या रोजगारा पेक्षा तिला दुप्पट पैसे मिळायचे पण ते कधी तिच्या वागण्यात किंव्हा बोलण्यात दिसलं नाही.

काही वर्षानंतर नलू आजारी झाली आणि मला अर्ध्या वाटेत सोडून गेली. मी परत एकदा एकटा पडलो. हिशोबाची वही अशीच चाळत असताना मधलं एक पान दुमडून ठेवलं होत. त्यात नलू ने काही लिहिलं होत.

नलू : तशी गरज भासणार नाही, पैसे खूप जमा झालेत आपल्याकडे. पण ते खर्च करायला आपण एकत्र नाही आहोत. मी काही स्वेटर शिवून ठेवले आहेत. तुमच्या आवडीच्या रंगाचे स्वेटर तुम्हाला ठेवा.

आणि बाकी छोटे, मोठे स्वेटर वेगवेगळ्या बाल आश्रमात जाऊन वाटप करा. आपल्याला मुलं नाहीत त्या मुलांबरोबर वेळ घालवा.

मी : लग्न करून मी तिला घरी आणलं होत, जगण्याचा हिशोब तिने मला शिकवला. कळत न्हवतं माझ्या नावाच्या आधी तीच नाव लावू की माझ्या नावाच्या नंतर.

माझी नलू.....