स्पेलिंग

Started by Sagar salvi, May 20, 2019, 12:45:47 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

एक स्पेलिंग सतरा हजाराची !
आज एका घरात गेलो होतो, तर एका मोठ्या शिशुला असलेल्या मुलावर अत्याचार होत होता. अत्याचार कसला तर त्याचा अभ्यास घेतला जातं होता. पण त्याला सगळ्या जाणीवा करून देता देता.

जसं तुला एक स्पेल्लिंग येतं नाही, उद्या परीक्षा आहे आणि तुझं काय चाललाय. किती खेळशील. ही स्पेलिंग सांग, ती स्पेलिंग सांग. नाही मग तू काय केलास अभ्यास. ते सांग. तो मुलगा इतकं घाबरला होता की तो फक्त रडतं होता.

Mpsc किंव्हा upsc ची परीक्षा देणार आहे असं त्याची आई त्याला वागणूक देतं होती. आई नेहमी बरोबर असते पण वागणूक चुकीची होती.

मग तिने सांगितलं तू शाळेत जाऊ नकोस. मी तुझ्यासाठी इतके पैसे भरते. सतरा हजार फी भरली आहे आणि तुला या साध्या साध्या स्पेलिंग येतं नाहीत.

मी सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहे. तुला काय वाटलं मला काही कळत नाही.

पण तो बिचारा तिच्या शिक्षणा बद्द्ल काही बोलतही न्हवतं किंव्हा त्याला तिच्या शिक्षणा बद्द्ल काही कळतही न्हवतं.

मज्या तर तेंव्हा आली जेंव्हा तिने कहर केला.

तिने त्याला चिकन ची स्पेलिंग विचारली. आणि त्याला नाही सांगता आली. मग ती परत चालू झाली. अरे सतरा हजार भरते मी आणि तुला चिकनची स्पेलिंग येतं नाही.

मला कळतच न्हवतं की सतरा हजाराशीं त्या मोठ्या शिशु मधल्या मुलाचा काय संबंध.

आणि तू सतरा हजार भरलेस ते एका चिकनच्या स्पेलिंग साठी.

म्हणजे ते सतरा हजार, तो मोठ्या शिशूतला मुलगा, इंग्रजी, आणि चिकनचं स्पेलिंग काही जुळतच न्हवतं.