चहा

Started by Sagar salvi, May 20, 2019, 12:51:01 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मैताला गेल्यावर चहा मिळत नाही !
लहान असताना म्हणजे एक चार वर्षा पूर्वी पहिल्यांदा बाबा, काका, मामा आणि मी एकत्र एका नातेवाईकांच्या मैताला गेलो होतो. पोहचे पोहचे परेंत तास दीड तास गेला. मी लहान असल्यामुळे मला फारस कळत न्हवतं,

पण कोणतरी गेलय म्हटलं तर खूप गंभीर वातावरण असणार या तयारीने मी गेलो होतो. तिकडे सगळे नातेवाईक खाली जमा होते. एकमेकांशी बोलतायत. काही तरी प्रश्न विचारतात आणि उत्तर जमा करतातं हे कळलं. अचानक एक गृहस्थ काकांच्या बाजूला उभा राहून काही तरी कानात बोलत होता. काका पटकन हो म्हणाले आणि जवळ जवळ सगळे म्हणजे बारा ते पंधरा नातेवाईक एकत्र कुठे तरी निघाले.

मी नविन असल्यामुळे मला कळत न्हवतं नेमकं काय आहे. आपण चाललोय कुठे. पण विचारणार कस. म्हणून गपचूप चालत राहिलो. आणि हा मोर्चा एका दुकानासमोर येऊन थांबला.

मी विचाराल काकांना हे काय आहे, आपण इथे का आलोय. तर त्या नातेवाईक असलेल्या सद्गृहस्थाने मला सांगितले. एकदा वरती गेलो मैताच्या घरात की चहा मिळणार नाही.

मला कळत न्हवतं की आपण नेमकं कुठे आलोय. पण एक गोष्ट कळली की मैताला गेल्यावर चहा मिळत नाही.

दुःख विसरून चहा प्या...