न्याय

Started by Sagar salvi, May 20, 2019, 01:25:42 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

परिस्तिथीचा मुलगा !
मी एकदा असाच रस्त्याच्याकडेने गावातून घरी चालो होतो. तर रस्त्याच्याबाजूला एक फाटके कपडे घालून मुलगा बसला होता. उपाशी दिसत होता. मी त्याला विचारलं कोण आहेस तू तर त्याने प्रश्न टाळला. आणि थोडा घाबरलेला दिसला.

कुठून आलास विचारल तर म्हणाला मला पाठवलंय. मला काही कळलंच नाही.

मी : म्हणजे?

तो : मला लपायला सांगितलंय. म्हणजे समोर येऊ नकोस, अश्या ठिकाणी लप की कोणाला सापडला नाही पाहिजेस.

मी : पण कश्यासाठी?

तो : माहिती नाही.

मी : मग तू कोणाला शोधतोयस का?

तो : मी कोणाला शोधणार, लोकच येतात मला शोधायला.

मी : अच्छा, मग आता तू कुठे जाणार?

तो : मी आता या गावातून त्या गावात फिरणार बघणार मी हवाय का कोणाला?

मी : अच्छा, आणि मग घरचे कुठे असतात? म्हणजे आई आणि बाबा वैगरे.

तो : आई मला जास्त भेटत नाही.

मी : का? असं.

तो : लोकांमध्ये जिथे बिचारी लोकं आहेत तिथे ती असते.

मी : म्हणजे कोण आहे तुझी आई, नाव काय तीच?

तो : माझी आई " परिस्थिती ".

मी : काय तुझ्या आईचं नाव " परिस्थिती " आहे.

तो : हो आणि ती सगळ्याच ठिकाणी असते. पण बहुतेक ठिकाणी जिथे ती असते तिथे मी नसतो. त्यामुळे फारशी भेट होत नाही.

मी : आणि मग बाबा? ते कोण आहेत.

तो : आहेत ना, ते जास्तीत जास्त वेळ आई बरोबर असतात.

मी : अरे वा, बर आहे, आईला छान सोबत मिळत असेल. नाव काय त्यांचं.

तो : "अन्याय ".

मी : काय बाबांचं नाव " अन्याय ", म्हणजे तू त्या अन्यायांचा मुलगा आहे.

तो : हो, "परिस्थिती" म्हणजे माझी आई कशीही असो, पण बाबा म्हणजे मिस्टर "अन्याय "आजूबाजूला असतातच.

मी : मग तू कोण आहेस आणि तू तुझ्या आई बरोबर का नाहीस?

तो : मला लोकं आई बरोबर जास्त वेळ राहू देतं नाहीत. आणि प्रत्येक वेळी आई बरोबर मी नसतो.

मी : हो पण तुझं नाव काय?

तो : " न्याय ".