डिलिव्हरी

Started by Sagar salvi, May 20, 2019, 05:27:58 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

चौथीचा होम डिलिव्हरी बॉय !
एक मुलगा चौथीचा, शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि त्या मुलाला प्रश्न पडला की करायच काय?

बाबा सकाळी लवकर कामाला जाणार, आई घरात काम करायला लागणार, दिवसभर फक्त टीव्ही बघत बसायच म्हणून कंटाळा.

त्या मुलाने सुट्टीच्या दिवसात पैसे कमवायचं ठरवलं. आणि काय करायचं हा विचार करत होता.

त्याच्या लक्ष्यात आलं आपल्या पण ओळखी आहेत, मी जर त्यांना विचारलं तर मला काम मिळेल. मग त्याने किराणा वाला गाठला. त्याला विचारलं काही काम मिळेल का. तो म्हणाला अरे छोटू "तू काय काम करणार? " काही काम नाही.

मग तो दूध वाल्याकडे गेला त्याला विचारलं काही काम आहे का? दूधवाला म्हणाला तुला का काम पाहिजे? छोटू म्हणाला मला पैसे कमवायचे आहेत सुट्टीत. काम मिळेल का? नाही रे माझ्या काही काम नाही. तू खूप लहान आहेस.

मग तो शेवटचा पर्याय भाजीवाल्या आजीकडे गेला आणि म्हणाला आजी मी नेहमी तुमच्याकडून भाजी विकत घेतो की नाही. आजी म्हणाली हो, मग

छोटू म्हणाला मला काम दया. मला शाळेला सुट्टी पडली आहे मला पैसे कमवायचे आहेत मला काम दया.

अर्धा दिवस दोघांनी खूप विचार केला मग काम द्यायचे ठरलं.

उद्या सकाळी सात वाजता ये. करूया काम. असं बोलून आजीने छोटूला घरी पाठवलं.

छोटू घरी गेला आईला खूप खुश होऊन सांगितलं की उद्या सकाळ पासून मला कामाला जायचं आहे मला डब्बा दे जेवणाचा जसा बाबांना देतेस.

दुसरा दिवस :

सकाळी छोटू पाच वाजता उठला आणि तयार झाला. शाळेचं दप्तर,जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन आजीच्या भाजीच्या टेबलापाशी आला. आजी तेथून चालत येते होती टोपली घेऊन. त्याने आजीला मदत केली टोपली खाली ठेवली पिशवी घेतली आणि तो आजी सांगेल तशी भाजी बाकड्यावर लावू लागला.

भाज्यांवर पाणी मारलं, भाज्या धुऊन नीट ठेवल्या आणि छोटू छोटुश्या दगडावर मांडी घालून बसला. वाट बघत कोण येतंय का.

खूप वेळा नंतर एक काका आले त्यांनी जवळ जवळ शंभर रुपयांची भाजी विकत घेतली आणि ती सगळी भाजी छोटूने पिशवीत भरून दिली.

तो त्या काकांना म्हणाला तुम्ही कुठे राहता, काका म्हणाले त्या बाजूच्या बिल्डिंगमधे. छोटू म्हणाला चला मी पिशवी घरी पोचवतो. काका सुरवातीला नको म्हणाले पण छोटूचा बारीक झालेला चेहरा बघून म्हणाले चल नीट जमेल ना उचलायला.

छोटू पुढे काका मागे, कळत न्हवतं कोण कोणाच्या घरी चाललय. मग काकांनी घराची बेल वाजवली आतून काकू आल्या त्यांनी दरवाजा उघडला आणि बघितलं तर छोटा मुलगा. त्याला आत बसवलं आणि पाणी दिल. पिशवी ठेऊन तो परत जाणार तेवढ्यात काकीनी विचारलं हे तू कधी पासून करतोस, छोटू म्हणाला आज पहिला दिवस आहे.

सुट्टी पडली आहे घरी बसून काय करू म्हणून मग आजीकडे कामाला लागलो.

छोटू म्हणाला चला मी येतो. आणि छोटू जाणार तेवढ्यात काकींनी छोटूच्या हातात दोन रुपये दिले. छोटूला खूप आनंद झाला.

त्याच्या कामाचा पहिला पैसा होता. तो आजीकडे गेला तिला त्याने सगळं सांगितलं. आजीला ही पद्धत खूप आवडली.

अश्या पद्धतीने छोटूला दिवसाचे वीस ते पंचवीस रुपये मिळू लागले.

छोटूच्या घरचा पैश्यांचा डब्बा सुट्टीत भरत होता आणि त्याच्या नवीन नवीन ओळखी होत होत्या.

छोटूने पाचवीचा स्वतःचा शाळेच्या पुस्तकांचा खर्च स्वतः केला. आणि बुटांचा सुद्धा.