आई

Started by Sagar salvi, May 22, 2019, 12:18:55 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

आई !
करायला बसलो अभ्यास
की ती बाजूला बसून राहायची,
मला काही येतंय की नाही
ते तिरक्या नजरेत पाहायची.

मला त्यातलं कळत नाही
पण मोठ्याने वाच म्हणायची,
माझेच शब्द माझ्या मागून
पुन्हा पुन्हा बोलायची.

माझ्या हातात पुस्तकं देऊन
घास मला भरावलाय,
न खाल्लेला घास तिने
खोटा खोटा जिरवलाय.

सकाळी लवकर उठवून मला
अभ्यासाला बसवायची,
स्वतःची झोप पूर्ण झाल्याच
मलाच खोटं फसवायची.

गरम गरम भाकरीचा
माझ्यासाठी असायचा बेत,
धावत पळत अनवाणी
तुडवत यायची काटेरी शेत.

आज तिने पाहिलं मला
सूट बुट घातलेला,
तिचा पदर अजून तसाच
अर्धा सुरधा फाटलेला.