लपाछुपी

Started by Sagar salvi, May 23, 2019, 10:57:01 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

केसांची लपाछुपी !
तो कट होता हवेचा
केसांना चेहऱ्यावर आणण्याचा,
तुझ्या केसांना मिळावा पर्याय 
गालाच्या जवळ राहण्याचा.

तु त्या केसांना ही अलगद
कानाच्या मागे लपवलंस,
कानाचा आधार घेऊन
त्या गालाला फसवलंस.

हवा सुद्धा आता
काही बडबडू लागली,
केसांना चेहऱ्यावर आणण्यासाठी
धडपडू लागली.