पाणी

Started by Sagar salvi, May 23, 2019, 03:08:53 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

घाम आणि अश्रू !

ऊन इतकं प्रखर होतं
की आटले होते दवबिंदू,
दमलेल्या थकलेल्या कपाळावर
जमले कुठून श्रमबिंदू.

भरपूर वेळ ते तग धरायचे
त्या पापण्यांच्या केसांची,
नंतर स्पर्धा सुरु व्हायची
आतल्या बाहेरच्या थेंबांची.

घामामधे आणि अश्रूंमधे
नेमका तो फरक काय,
घाम मुरतो अंगामधे
अश्रू डोळ्यात मुरत नाय.