मीच

Started by Sagar salvi, May 24, 2019, 12:33:20 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

माझा मीच !
एकटाच बसून असतो
शेजारी मी स्वतःच्या,
आधी बोलायचो दोघे आम्ही
आता विरोधात बोलतो ओठांच्या.

भांडण होऊ नये म्हणून
एकमेकांकडे पाठ केली,
मन आमचं मऊ राहिलं
पाठ तेवढी राठ झाली.

नाही समजून घेतलं त्याने
ना मी कधी त्याला,
तरीही पुरायचा दोघांमध्ये
पिताना एक प्याला.

कधी तरी तो वळेल
माझ्याकडे बघण्यासाठी,
पुन्हा एकदा हात मागेल
एकत्र जगण्यासाठी.

दूर निघून गेला तो
मी राहिलो एकटाच ,
आता सुद्धा लपतो तो
मला लांबून बघताच.