एकटा

Started by Sagar salvi, May 25, 2019, 09:20:47 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

एकटा !
कमी केलय मी आता
स्वतःशी गप्पा मारणं,
नाही जमत सारखं सारखं
इतक्या वेळा हारणं.

बघत राहतो एकाच ठिकाणी
नजर लावून मी,
नजर माझी तिथेच राहते
तिथून गेल्यावर मी. 

येतो पुन्हा दुसऱ्या दिवशी
तीच नजर, तेच बघणं,
हलणाऱ्या वस्तू स्तब्ध होतात
ते ठिकाण माझं होतं जगणं.