खांदे

Started by Sagar salvi, May 28, 2019, 08:12:05 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

डोळे पेलणारे खांदे !

रडताना बघितलं की
येतात खांदा द्यायला,
खांदा थोडा ओला झाला
की नसतं कोणी डोळ्यात पाहायला.

प्रत्येक डोळ्यांना लागतो
एक विशिष्ट प्रकारचा खांदा,
तो खांदा वाहून गेला
की लागतो दुसरा खांदा.

येतो काहींच्या खांद्यावर
दुसऱ्याच्या डोळ्यांचा भार,
कधी कधी ते खांदेचं करतात
बंद डोळ्यांवर वार.

नको कोणाचे डोळे
आणि नको कोणाचा खांदा,
आपल्या आपल्या डोळ्यांसाठी
आपलेच खांदे बांधा.