पाय

Started by Sagar salvi, May 29, 2019, 03:39:07 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पायांचा प्रवास !

निघाले होते पाय तेंव्हा
वेगवेगळी वाट होती,
आता अर्धी रात्र सरली
निघालो तेंव्हा पहाट होती.

चालता चालता कुठे आलो
पायांनाही कळले नाही,
सांगितलं तरी किती वेळा
पण एकदाही वळले नाही.

रस्ता संपत न्हवता
म्हणून पायही थांबत न्हवते,
का पायाला सोबत व्हावी
म्हणून रस्ते लांबत होते.

पाय इतके पुढे आले
की नेमकं ठिकाण मागे गेलं,
त्याला होती काळजी पायाची
म्हणून पायाला न्हवतं जागं केलं.