बाजार

Started by Sagar salvi, May 30, 2019, 11:43:48 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मनाचा बाजार !

मन सजवून घेऊन गेलो
आज बाजारात विकायला,
मनालाही लागला वेळ
स्वतःची किंमत कळायला.

मनाला वाटलं मी एकटाच आहे
पटकन विकला जाईन,
विकत घेणारे कमी होते
होती विकणाऱ्यांचीच लाईन.

वेग वेगळ्या मुखवट्यांनी
मनाला सजवून आणलं होतं,
काहींचं तुटलेलं, काहींचं सुकलेलं
काहींनी भिजवून आणलं होतं.

एका क्षणी विचार आला
माझं मन मी का विकू,
मन अजून मनचं आहे
कुठे झालेत त्यांचे चिकू.

शरीरात जेवढी नसते
तेवढी मनात असते हिंम्मत,
शरीरावर लावले जातात डाव
माहिती नसते मनाची किंमत.

आलो घरी बसलो शांत
मन घरात नाचू लागलं,
मनामुळेचं देह जगतो
हे लिहिलेलं वाचू लागलं.