ठसे

Started by Sagar salvi, June 04, 2019, 12:29:04 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ठसे !
उमटलेल्या माझ्या ठस्यांना
लाटेने अलगद उचलून न्हेले,
परकी वाळू, परके ठसे
लाटेने त्यांना आपले केले.

उमटले ते ठसे पाण्यावर
पाणी थोडे गढूळ झाले,
याच प्रवासामुळे कदाचित
ठसे पाण्यात राहून आले.

काही अक्खे बुडून गेले
काही अर्धे विरळ झाले,
काही तसेच उमटून राहिले
काही तसेच पुसट झाले.

आता जेंव्हा पाणी येते
त्या ठस्यांना शोधत शोधत,
ठसे काही सापडत नाहीत
वाळूच न्हेते ओढत ओढत.

काही ठसे धाव घेतात
विरुद्ध त्या पाण्याच्या,
काही ठसे आदी झालेत
पाण्याखाली राहण्याच्या.