अरे माणूस म्हणून जप माणुसकी थोडी ……………

Started by SHASHIKANT SHANDILE, June 06, 2019, 11:26:14 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

तोडुनिया झाडं तुम्ही ऊन वारा केला
कुठं थांबवावं पाणी कळतंच नाही !
सारं वाहून चाललं पाणी निळ्या सागरात
कशी भागवू तहान पाणी मटक्यात नाही !!

होतं चालला माणूस आज आधुनिक किती
नदी तलावाचं पाणी पिण्याजोगं नाही !
रस्ते उन्हात तापती नाही कुठलीच छाया
श्वास मोकळा हवेला जगण्यास नाही !!

घरं जंगलातं गेली झालं सिमेंटीकरण
पिकं पिकवाया शेती उरलीच नाही !
होतं चालली पाखरं सारी नजरेच्या आड़
आज उठवाया इथे कोंबडीच नाही !!

पोट भरेना भाकऱ पैसा किती मोठा झाला
एक परिवार आता एकोप्यात नाही !
अरे माणूस म्हणून जप माणुसकी थोडी
वेळं अजूनही गेली हातातून नाही !!
---------------------//**--
(एकांत)
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!