असलो Non residential तरी...

Started by shindekv, June 06, 2019, 05:21:11 PM

Previous topic - Next topic

shindekv

असलो Non residential तरी
आहोत आम्ही भारतीयच हो
खात असलो बर्गर पिझ्झा तरी
भावते आम्हाला पिठलं भाकरीच हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

New York times च्या अगोदर सुद्धा
वाचतो आम्ही पुढारी अन् सकाळच हो
Trump तात्यापेक्षा जास्त भावतात आम्हाला
बाळासाहेब आणि थोरले पवार साहेबच हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

शिवजयंती असो वा दिवाळी
झाडून साजरे करतो सगळे सण आम्ही हो
महाराष्ट्र मंडळात आमच्या
गणपती सुद्धा बसवतो आम्ही हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

कमावत असलो थोडं जास्त तरी
बदल्यात खूप भोगतोसुद्धा आम्ही हो
ग्रीन कार्ड अन् सिटीझनशिपच्या चक्रव्युहात आडकून
आप्तेष्टांची लग्न अन् मयतं सुद्धा मुकतो हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

आमच्या परीने आम्ही
पाठवतो परकीय गंगाजळी हो
विदेशी क्लायंटला सुद्धा भारतालाच
प्रोजेक्ट द्यायला भाग पाडतो आम्ही हो!
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

किरण शिंदे