जंगल

Started by Sagar salvi, June 07, 2019, 08:58:03 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

जंगल !
जात होतो त्या वाटेने
जंगल कधी लागले,
ती वाट झोपली लवकर
जंगल माझ्याबरोबर जागले.

रात्री काळोख इतका
की जंगल सुद्धा घाबरते,
कधी मी त्याला कधी ते मला
थोडे थोडे सावरते.

खूप प्रयत्न केला
काजव्यांनी झोपवायचा,
कोण कुठला रात किडा
मधेच येऊन उठवायचा.

वाट आता संपलीय
झाडं झुडपं बोलली,
काही झाडांच्या काट्यांनी
माझी कातडी सोलली.

जंगल काही संपत न्हवतं
खूप गेलो दूर,
जंगलातल्या त्या शांततेचा
वेगळा होता सूर.

कुठूनतरी खळखळणारा
आवाज आला कानी,
नागासारखं वळवळणारं
सरकत आलं पाणी.