कन्यादान

Started by sneha31, June 08, 2019, 04:41:03 PM

Previous topic - Next topic

sneha31

कन्यादान

छोटीशी असतांना हाथ पकडून चालायला शिकवतो
तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेकीला तो जपतो
नवं नवीन कपडे आणून लेकीला खुश तो करतो
काळजावर दगड ठेवून कन्यादान तो करतो कारण तो बाप असतो

लेकीला आवडीचं खायला तो आणून देतो
खेळायला बागेत फिरायला तो घेऊन जातो
कामावरून येतांनी लेकीसाठी चॉकलेट तो आणतो
काळजावर दगड ठेवून कन्यादान तो करतो करण तो बाप असतो

लेकीच्या शिक्षणा साठी घाम तो गळतो
लेकीच्या सुखी संसारासाठी योग्य स्थळं तो शोधतो
स्वतःच्या अंगणातली फुल तो दुसऱ्यांच्या अंगणी फुलवतो
काळजावर दगड ठेऊन कन्यादान तो करतो कारण तो बाप असतो

लेक कितीही मोठी झाली तरी बापासाठी ती बहुलीच असते
लेक वयात आल्यानंतर तिच्या अब्रूची काळजी त्यालाचं असते
लग्नात काही कमी पडू नये म्हणून जीवचं रान तो करत असतो
काळजावर दगड ठेऊन कन्यादान करतो कारण तो बाप असतो

सनेहा माटूरकर
( भंडारा )
8-6-2019