वटवटसावित्री

Started by siddheshwar vilas patankar, June 17, 2019, 12:39:45 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

हे देवी वटसावित्री

मी पण पूजेन तुला

लपून छपून फेरे घेईन

उद्या पौर्णिमेच्या रात्री

माझे सर्व काळे धंदे

अव्याहतपणे चालू देत सदैव

कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या

नाहीतर होतील माझे वांदे

मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी

फार कठीण गं , झेलणं तिला

ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष

पण दुर्दैवाने वटवटसावित्री

वटवट करूनच मारते

माझ्या नावाने फेरे

नेहेमी मागते देवाकडे

मिळू देत याचे सर्व धागेदोरे

इतकी वर्षे लोटली

कळला नाही तुझा महिमा

आज तुला मी शरण जातो बघ

थांबव माझी दैना

सूत घेऊनि, दिवा लावेन

रोवेन मी पण एक फांदी

पानसुपारीची व्यवस्था व्हावी

जेणे होईल माझी चांदी

हे वर्ष जर गेले निर्विकार

वाहेन पुढच्या वर्षी हार

गुप्त राहू देत हरेक धंदे

जरा दाखव तू चमत्कार

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C