वेळ आहे

Started by शिवाजी सांगळे, June 17, 2019, 09:19:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वेळ आहे

सावळ्या रंगात मेघ सावळे रंगले
अजून वेळ आहे नभ असे दाटले

नाव उभी होऊनीया अचल स्तब्ध 
प्रतिबिंब जळी स्थिर माझे उमटले

डौलात येथे शांत लयबद्ध तरीही
निरव डोही कंकण वलय तरंगले

प्रतिक्षेत उभा मीन गळी लागण्या
कार्यात रम्य या मन सहजी रमले

काळ वेळ थांबला माहौल येथला
विसरूनी भान सारे चित्त हे दंगले

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९