रात्र

Started by Sagar salvi, June 18, 2019, 09:02:44 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पाहून तुझा हा रंग असा
नभ ही खाली वाकले,
रुप तुझे ते पाहून रात्री
चांदण्यांनी देखावे आखले.

तुला पाहत पाहत चंद्र
रात्री सोबत जागला,
चंद्र म्हणवता म्हणवता स्वतःला
दिव्या सारखा वागला.

तुझ्यात स्वतःला चंद्राने
निरखून एकदा पाहिले,
विरघळली ती रात्र आता
प्रतिबिंब तुझ्यात राहिले.

Rasdonly

I want to know more about this. It will make me get more and more back.