काळजाच्या तुकड्यांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 20, 2019, 12:51:42 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.काळजाच्या तुकड्यांना*

आता मी कोणाचा होऊ कसा
काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा

अगं वेडे जगू दे
मला मनासारखं
तुझ्यामुळेच या
दुनियेने केलं परखं

दुनिये समोर भावनांना नेऊ कसा
काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा

शब्दांचं जगणं आता
घायाळ झालं आहे
वाईट नसतांना ही
मरण जवळ आलं आहे

त्या मरणावर विश्वास ठेऊ कसा
काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा

एक कविता प्रेमाची
अपूर्ण राहून गेली
मात्र तुझ्या विरहानं
कविता वाहून नेली

तुझ्या नजरेस कवितेला भिडवू कसा
काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा

गळ्याच ताईत मी
नकळत होऊ पाहिलं
त्या गडबडीत सारं
आयुष्य तुला वाहीलं

पाहून बरबाद आयुष्य जेवू कसा
काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर