चला , धुवायची सोय झाली

Started by siddheshwar vilas patankar, June 20, 2019, 03:22:57 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

चला , धुवायची सोय झाली

आली आली पावसाची पहिली सर आली

न्हाऊन धुवून गेले पाहिजे कामावर

सांजच्याला भिजतच येऊ , निवांत घेऊन अंगावर

येईल येईल सांगतच होतं

आपलं झोपलेलं हवामान खाते

पुस्सून पुस्सून झाले होते सर्वांचे बुरे हाल

दगडधोंड्यांचा रंग झाला होता लालेलाल

त्या दगडधोंड्याना पूर्ववत करणारा मायबाप आला

चिंब भिजवणारा , धुवून काढणारा पाऊस आला ....

घ्यावा लागणार नाही आता कुठेही आडोश्याचा थारा

मनसोक्त मळे फुलवू शकतो, काढून पिसारा

कशाला हवेत आडोसे अन किनारे ?

कोसळल्या बघा धारा ढगातून , पाणी आले रे

कुठे बसावं अन किती लपावं ?

कशी सांभाळावी ती हागणदारी ?  :'( :'( :'( :'(

चिंता मिटवली सुरुवात करुनि जोरदार

आली आली पहिली पावसाची सर आली  :D :D :D

चला , धुवायची सोय झाली

आली आली पावसाची पहिली सर आली  :D :D :D


{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C