जखमा

Started by Sagar salvi, June 21, 2019, 02:55:55 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

जुने थेंब सुकले नाही
तोवर नविन यायला लागले,
जखमा आत दाबून ठेवलेल्या
बाहेर काढायला लागले.

आत आत मुरत गेलं
ते खारटवाल पाणी,
बरं करायचं सोडून ते
दुखणं वाढायला लागले.

आज अचानक कळ आली
जखमा नसलेल्या ठिकाणी,
जखमा सुद्धा इंस्टॉलमेंटमधे
कळ पाठवायला लागले.