पांडुरंगा

Started by wadikar durga, June 25, 2019, 03:29:22 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

इथे कुणी ना कुणाचा ..
पांडुरंगा तूच माझा आधार ?
आमवासेचा दाटला अंधार
आभाळ ही काळवंडले

मन ही अधीर झाले
वादळवारा भेडसावतो
माझ्या वेडया मना
कशी सवारु कुठे जाऊ
मिळेना कूठ थारा

भार म्हणोनि हिनवती
समाजातील आपलेच
पांडुरंगा तूच एक माझा
तुझे उघडे मजसाठी ..... आता दार
........... @Durga 

Arjun jadhav

*माऊली महाराज कुरुळेकर यांस समर्पित कविता...*


*🍁माऊली🍁*

_________________________

माऊली,
शब्द तुमचे , विचार तुमचे तुम्हीच महाज्ञानी ।
मला वाटले म्हणून लिहितो  मी काय भोळा प्राणी  ।।

माऊली ,
तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनी ।
कमी नाही आम्हास पाणी ।।

माऊली ,
परंतु माय माता भूमीही तहाणली आता ।
पाणी पाणी म्हणती सर्व हीच सर्वांची व्यथा ।।

माऊली ,
सुज्ञ करा जना सांगा लावण्यास वृक्ष ।
दुष्काळ आहे वैरी सांगा टाळण्यास लक्ष ।।

माऊली ,
दुष्काळाने घातला आहे बघा कसा घाला ।
कळू द्या सर्वांस बुद्धि द्या सर्वाला ।।

माऊली,
करतो विनवणी म्हणे तुमच्या रूपा ।
सुखी ठेवा सर्वां करा एवढीच कृपा ।।