आई

Started by Sachin Mhetre, June 26, 2019, 07:54:40 PM

Previous topic - Next topic

Sachin Mhetre

आई

झुंजूमुंजू झाले, पक्षी उडाले गं आई
'उठ बाळा', आजं तुझी हाक कानी नाही ।।१।।

चोचीमध्ये पिल्लांच्या, चोचीने दाणे देई
घास भरवण्या आम्हा, आता कोठे शोधू आई ।।२।।

पंखात शिरण्या पिल्लांची, कितीक झाली घाई
भीरभीर करती डोळे, नजरेआड गेली आई ।।३।।

पंख पसरूनी पक्षीण, पिल्ले पंखाखाली घेई
तुजवीन आता आम्ही, झालो पोरके गं आई ।।४।।   


सचिन म्हेत्रे, पुणे
(मो. ९४२०२१२८३८)